अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील प्रशासकीय कार्यालयात निवडणूक पूर्वी तयारीच्या अनुषंगाने ईव्हीएम यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.या तपासणीत एकूण 318 बॅलेट युनिटची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 272 युनिट सुस्थितीत तर 46 युनिट नादुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच 273 कंट्रोल युनिटची तपासणी केली असता त्यापैकी 257 युनिट कार्यक्षम असून 16 युनिट बिघडलेले असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.
हेही वाचा
महिलेची पोलीस असल्याचे भासवून फसवणूक; १ लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास
दरम्यान, जिल्हा परिषद प्रभाग रचना संदर्भात नागरिक व राजकीय पक्षांकडून २१ जुलै २०२५ पर्यंत एकूण ४४ हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ४२ हरकती तहसील कार्यालयास प्राप्त झाल्या असून उर्वरित २ हरकती जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्याचेही तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
प्रशासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी सज्ज असून तांत्रिक बिघाड असलेल्या यंत्रांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी प्रांत अधिकारी प्रमोद हिले,तासीलदार प्रशांत पाटील,निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड,निवडणूक नायब तहसीलदार डॉ संदेश निकुंभ,संजय गांधी विभाग नायब तहसीलदार बी आर शिंदे तसेच परिश्रम घेणारी मंडळ अधिकारी,तलाठी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते तसेच विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
