संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
परिवहन सुरक्षा समितीतर्फे उद्या दि.31 जानेवारी नगावंबारी हॉटेल साईकिशन समोर ,धुळे नेत्र तपासणी आयोजित करण्यात आली आहे. तरी धुळे शहरातील व जिल्ह्यातील वाहन चालकांनी याचा लाभ घ्यावा अशी विंनती मा.जितेंद्रसिंग राजपूत यांनी केली आहे.
धुळे(प्रतिनिधी) – मानवी समाजात ड्रायव्हर या घटकाला नेहमी तुच्छ अशी वागणूक मिळत असते .मग ती मानसन्मान असो व्हा वैवाहिक जिवनात लग्नासाठी असो ड्रायव्हर म्हंटला म्हणजे समाजात त्याची प्रतिमा हि एक व्यसनाधिश व अशिक्षित म्हणून रंगवली जाते.याला काही वाहन चालक अपवाद ठरू शकतात कारण खूप वेळ गाडी चालवावी लागते थकवा , कष्ट , दूर करण्यासाठी ते काहीतरी व्यसन हे करतातचं या दगदगीच्या जीवनातून क्षणभर विश्रांती म्हणून व्यसन करतात याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वाहन चालक हा व्यसनाधिशचं असतो.
उत्तम वाहन चालकाला आपल्या डोळ्या संदर्भात गाफील राहता कामा नये कारण एक उत्कृष्ट वाहन चालक होण्यासाठी त्याने आपल्या डोळ्या संदर्भातील समस्या दूर करायला हव्या म्हणून दैनिक अतुल्य भारतचे संपादक जितेंद्र सिंग राजपूत यांनी उद्या दि.31 जानेवारी 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे , प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे , दिग्विजय फाउंडेशन व परिवहन सुरक्षा समिती ( मुंबई ) धुळे जिल्हा शाखा यांच्या सयुक्त विद्यमानाने विद्यार्थी , मोठे वाहनधारक चालक , छोटे वाहन धारक ( प्रवासी व मालवाहतूक ) करणाऱ्या वाहनचालकांचे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्रींकात धिवरे साहेब पोलीस अधीक्षक धुळे मा.अशोक पवार प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे , मा.प्रा.जसपालसिंग सिसोदिया अध्यक्ष दिग्विजय फाउंडेशन धुळे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे.
तरी धुळे शहर व जिल्ह्यातील तमाम स्कूलबस वाहन चालक , प्रवासी वाहतूक करणारे चालक , मालवाहतूक करणारे वाहन चालकांनी या नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा वाहन चालकांनी आपले आधार कार्ड व वाहन परवाना यांच्या दुय्यम प्रति सोबत आणावे असे आवाहन परिवहन सुरक्षा समिती अध्यक्ष मा. जितेंद्र सिंग राजपूत व सचिव शांताराम निकम यांनी केले आहे.
