Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)- दि २२ मार्च रोजी चॉपरने ने पोटावर वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू,वार करणाऱ्या तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील जैनाबाद येथील रहिवासी नितीन काळे (वय ३५) आणि संशयित आरोपी श्याम सूर्यवंशी यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. त्यावेळी श्यामने काचेची बाटली फोडून नितीनवर हल्ला केला होता. या प्रकरणाची केस न्यायालयात सुरु होती आणि त्यासाठी नितीन गोव्याहून जळगावात आला होता.
केस मागे घेण्यासाठी श्यामकडून प्रचंड दबाव टाकला जात होता. मात्र, केस मागे घेतली नाही म्हणूनच श्यामने चॉपरने नितीनची हत्या केल्याचा आरोप मयताचे वडील नाना काळे आणि भाऊ राजू काळे यांनी केला आहे. तर श्यामने नितीनला दारू पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि जुन्या वादातून त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.नितीन हा त्याचे आई-वडील, पत्नी, मुलगा भाऊ-बहीण यांच्यासह शहरात राहत होता.
काही महिन्यापूर्वी गोवा येथे कटलरीच्या दुकानात नोकरी मिळाल्यानं तो तेथे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. गेल्या चार दिवसापासून तो कोर्टाच्या कामानिमित्त जळगावमध्ये आला होता आणि दारू पिण्याच्या बहाण्याने श्यामने त्याला बोलावून जुनी केस मागे घ्यावी म्हणून वाद केला. श्यामने त्याच्या पोटात चॉपरने वार केला. नितीन हा त्याठिकाणी जखमी झाला असल्यानं त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.मात्र २३ मार्च सोमवारी रोजी उपचार सुरू असताना सकाळी ११ वाजता त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रांची मोठी गर्दी झाली होती. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता रुग्णालय परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
