बचत गट चाळीसगावचे म पोषण आहाराचा पुरवठा कुठून?जर शहरातून तर किचन साठी नगरपालिकेची नाहरकत घेतली होती का?नाहीतर पुरवठा धुळ्याहून शक्य कसा?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव : काही दिवसांपुर्वी चाळीसगावचे जय मातादी महिला स्वयं सहाय्यता बचत गट व सदस्या माता माधवी महिला स्वयं सहाय्यता बचत गट बचत गटाच्या नावाने धुळे येथील बोगस पुरवठेदाराने बचत गटाचे अनुदान परस्पर लाटले असल्याचे वृत्त यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते. याच पार्श्वभुमीवर बचत गटाच्या अध्यक्षा लता सुभाष अग्रवाल सखोल चौकशी केली असता याच बचत गटाच्या नावाने धुळ्याच्या बँकेत त्या पुरवठादाराने बनावट खाते उघडले असल्याचे उघडकीस आले होते. त्या बोगस ठेकेदारावर कारवाईक करावी अशी मागणी देखील बचत गटाच्या अध्यक्षा यांनी केली आहे असे असताना जर सदरील बचतगट चाळीसगावचा होता तर पोषण आहार धुळ्याहुन चाळीसगावला कसा येत होता? त्या पोषण आहाराचा दर्जा बालकांना देण्यायोग्य होता का? पोषण आहार मापात दिला जात होता का? अशा एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सदरील प्रकरणाची संबंधित अधिकार्यांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी अध्यक्षांनी केली आहे. अध्यक्षांनी प्रसारमांध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जे वाहन पोषण आहार वाटपासाठी शासन दप्तरी रजिस्टर करण्यात आले आहे ते धुळे येथील असुन ते धुळे येथुन रोज नाशवंत आहार (खिचडी, लापसी, उसळ) हे पदार्थ वाहतुक कसे काय करीत होते. यांच्या रेकॉर्डनुसार जर हे चाळीसगावी पोषण आहार बनवित असतील तर चाळीसगाव नगर पालिकेने त्यांना किचन एनओसी दिली आहे का? असा प्रश्न देखील बचत गटाच्या अध्यक्षांनी उपस्थित केला आहे. एकंदरीत या सर्वप्रकरणावरून बचत गट चाळीसगावातील पोषण आहाराचा पुरवठादार धुळ्याचा, चाळीसगावचे बनावट खाते धुळ्यात , बचत गटाच्या नावाने शासनाला कोट्यावधींचा चुना एवढे होऊन देखील धुळ्याच्या पुरवठादारावर संबंधित अधिकार्यांकडुन अजूनही कारवाई नाही. या सर्व बाबींचे गौडबंगाल काय? त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी बचत गटाच्या अध्यक्षांनी केली आहे.