महाराष्ट्रात पाच जिल्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक नियुक्त
मुंबई: नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशिम या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत सर्व ठिकाणी यश मिळविण्यासाठी पक्षाचे नियोजन सुरू झाले आहे. यासंदर्भात नुकतीच एक बैठक संपन्न झाली. यावेळी कार्याध्यक्ष मा.आ.मुजफ्फर हुसेन,आ.के.सी. पाडवी, आ.कुणाल (बाबा)पाटील, मा. आ.डाॅ. कल्याण काळे, मा.आ.मोहनराव जोशी, प्रदेश सरचिटणीस सर्वश्री विनायकराव देशमुख, प्रकाश सोनवणे, रामकिसन ओझा, अभिजित सपकाळ, राजेश शर्मा, राजाराम देशमुख व सर्व जिल्ह्यांची पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष मा.आ.बाळासाहेब थोरात यांनी यावेळी जिल्हा निहाय निरीक्षक जाहीर केले.
१)नंदुरबार:श्री.विनायकराव देशमुख श्री. ज्ञानेश्वर गायकवाड
२) धुळे: मा.आ.डाॅ. कल्याण काळे,
3) नागपूर: आ.सुभाष धोटे , श्री. शेखर शेंडे.
४) अकोला: माजी मंत्री वसंत पुरके, श्री. रविंद्र दरेकर
५) वाशिम: मा.खा. तुकाराम रेंगे, श्री. प्रफुल्ल गुडदे.