संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगांव(प्रतिनिधी)- विधानसभेत केलेल्या कार्याची पावती खुशाल मोरे यांना मिळाली असून राष्ट्रवादी(अजित पवार) गट सा.न्या विभागाच्या शहर अध्यक्ष या पदावरून वरिष्ठांच्या आदेशाने राष्ट्रवादी काॅग्रेस सा.न्या.विभाग चाळीसगाव तालुका अध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
खुशाल मोरे यांना राष्ट्रवादी काॅग्रेस सा.न्या.विभाग चाळीसगाव तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅग्रेस चे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिले असून यावेळी सा.न्या.विभाग जळगाव जिल्हा अध्यक्ष अरविंद मानकरी,जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले,युवक प्रदेश सरचिटणीस कुशल देशमुख, उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्ष अभिलाषा ताई रोकडे उपस्थित होते.यावेळी माजी मंत्री अनिल पाटील यांनी खुशाल मोरे यांना पुढील वाटचालीस साठी शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी बोलतांना सांगितले की पक्षाच्या ध्येयधोरणे राबविण्यासाठी कटिबध्द राहून पक्ष वाढीसाठी कार्य कराल हा विश्वास आहे.
यापूर्वी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण केल्याने ही जबाबदारी आपणास देण्यात आली असून आपण यात देखील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे शेवटी अभिनंदन करतांना सा.न्या.विभाग जळगाव जिल्हा अध्यक्ष अरविंद मानकरी यांनी खुशाल मोरे यांना सांगितले.
