अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) — अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ओढरे गावातील फलकाचे अनावरण रविवार, दि. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.याबाबत सविस्तर वृत्त असे की, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ओढरे शाखेचे नियोजनपूर्वक उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. राजेंद्रभाऊ राठोड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांची आरती करण्यात आली. त्यानंतर गावातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते महासंघाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
show moreया फलक अनावरण कार्यक्रमासाठी ओढरे गावातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी सहकार्य केल्याने सामाजिक एकोपा दिसून आला. कार्यक्रमात जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांनी आपल्या मनोगतात समाज एकजूट राहण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विविध समस्या सोडविण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून निवेदन व आवश्यक ते आंदोलन करण्यात येईल, तसेच मराठा समाजावर अन्याय-अत्याचार झाल्यास महासंघ ठामपणे आवाज उठवेल, असे त्यांनी स्पष्ट केले. इतर कोणत्याही समाजावर अन्याय झाल्यास त्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी महासंघ सदैव पुढे राहील, असेही त्यांनी सांगितले.शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी महासंघाची ध्येयधोरणे व कार्यपद्धती उपस्थितांना समजावून सांगितली. मा. राजेंद्रभाऊ राठोड यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.ओढरे शाखेचे अध्यक्ष भगवान इंगळे, उपाध्यक्ष रमेश देशमुख, सचिव बद्रीनाथ इंगळे, संघटक राहुल पाटील, खजिनदार पंकज देशमुख तर सल्लागार म्हणून राजेंद्र इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.फलक अनावरण प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे उपस्थित होते. तसेच जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, शहर सचिव सचिन गुंजाळ, तालुका संघटक शेखर पाटील, तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, युवक तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, युवक सचिव ललित पाटील, युवक उपाध्यक्ष ललित पाटील, धनराज सूर्यवंशी, बाळासाहेब निकम, राजेंद्रभाऊ राठोड, पोलीस पाटील अर्जुन निकम, तंटामुक्ती अध्यक्ष बाळा जाधव, बाळू आप्पा आदी मान्यवर उपस्थित होते.
show lessपत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772
