जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या शहर अध्यक्ष पदी शुभम पाटील

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगांव(प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शुभम मधुकर बोरसे ( पाटील ) यांची जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या ( दिल्ली भारत ) चाळीसगाव शहर अध्यक्षपदी यांची जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या शहर अध्यक्षपदी निवड राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र तुकाराम आहेर यांच्याकडून करण्यात आलेली आहे .नियुक्ती मिळाल्यानंतर शुभम बोरसे(पाटील) यांनी सांगितले की माझ्या वर फेडरेशनने दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पडणार असून फेडरेशनच्या वाढीसाठी व जनसामान्यांच्या अधिकारासाठी नेहमी तत्पर असणार आहे.
नियुक्ती झाल्याबद्दल जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेशदादा भैय्यासाहेब पाटील , मित्र मंडळ , पत्रकार बंधू , पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते , शंकर पवार , बबडी शेख , स्वप्निल पाटील , शिवराज पाटील , निखिल दीश्वरे गणेश पाटील , सौरभ पाटील , महेंद्र पानपाटील , पवन पवार यांच्यासह राजकीय , सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे .