दौंड तालुक्यातील खुटबाव येथे २५ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
दौंड तालुक्यातील खुटबाव येथील २५ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने दौंडची चिंता मात्र वाढतच चालली आहे.दिनांक-१२/०६/२०२० रोजी खुटबाव येथील तरकारी मालाची वाहतूक करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला हृदयाचा त्रास जाणवत असल्याने त्याला लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचे ऑपरेशन करण्याचे असल्याने त्याची कोरोना तपासणी करण्याचे ठरविले व तो आज दिनांक-१४/०६/२०२० रोजी तरूण पोजिटिव्ह आला त्याला कोणतीच लक्षणे नसताना तो तरुण पोजिटिव्ह आल्याने खळबळ उडाली व त्या तरुणाच्या संपर्कातील सर्व नागरिकांचे तपासणी उद्या घेण्यात येणार आहे अशी माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक राजगे यांनी दिली.