भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ भिमाभोई जयंती चाळीसगांव शहरात घाटरोड परिसरातील भोईगल्लीत उत्साहात संपन्न….

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दिनांक 25 मे, 2023 रोजी चाळीसगांव शहरातील घाटरोड येथील भोईगल्लीत भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ भिमाभोई जयंती उत्साहात संपन्न झाली.
जयंतीचे वेळी संत भिमाभोई यांचे प्रतिमेचे पुजन करण्यांत आले, प्रस्तुत कार्यक्रम सन्मानीय आमदार श्री. मंगेशदादा चव्हाण यांचे विशेष उपस्थित पार पडला, या जयंतीच्या कार्यकमांचे अध्यक्ष श्री. दिपक भोई यांनी आमदार श्री. मंगेशदादा चव्हाण दादासाहेब यांचा यथोचित सत्कार केला, त्याच बरोबर, जितेंद्र धनराळे नायब तहसिलदार यांचा समाजातील व्यक्ती नायब तहसिलदार या पदापर्यंत गेल्याने त्यांचा सन्मानिय आमदार श्री. मंगेश चव्हाण यांचे शुभेहस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तु देवुन सम्मानित करण्यांत आला. या प्रंसगी सन्मानिय आमदार श्री. मंगेश चव्हाण यांनी समाजाला संबोधित केले व आत्ता शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाच्या प्रवाहात यावे, तसेच इतर व्यवसायात तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी कटीबध्द असुन योग्य ती मदत करण्यांचे आश्वासित केले.
कार्यक्रमात विषेश अतिथी नायब तहसिलदार श्री. धनराळे यांनी आपल्या मनोगतात असेही म्हटले की, व्यक्ती जन्माने नव्हे तर कर्माने महान होतो, संतभिमा भोई एका सामान्य कुंटूबात जन्माला आले, शिक्षण घेवुन त्यांनी रंजल्या गाजलेल्या माणासांविषयी सतत विचार करुन दुखाचे कारण म्हणजे अज्ञान आहे हे लक्षात आल्याने त्यांनी चिंतन व मनन करुन त्यावेळेचे संताच्या सहवासात राहुन अभ्यास करुन समाजाला दिशा देण्यांचे काम केले. त्याच बरोबर समाजातील तळागळातील माणसाला मदत करणे हाच खरा भक्ती भाव हीच परमेश्वराची पूजा आहे असे आवर्जुन सांगितले, भोई समाजात माझा जन्म झाला व नायब तहसिलदार या पदावर आज काम करीत आहे, यांचा आनंद आहे परंतु, समाज अदयापही तितका शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करीत नाही ही खंत मनाला नेहमी बोचत असते. समाजाने शिस्तप्रिय वागुन आपल्याकडुन कोणीही दुखी होणार नाही कोणालाही त्रास होणान नाही असे वागावे, तसेच समाजाचे मुले मुली यांनी शिक्षण घ्यावे मोठे व्हावे, डॉक्टर, इंजीनिअर, प्राध्यापक व्हावे अशा तेव्हाच खरे अर्थाने संत भिमा भोई यांच्या नांवाचा झेंडा आभाळात उंच उंच फडकवत ठेवल्याचा परमांनंद होईल, त्यामुळे मुलांना मंजिले उन्हीको मिलती है, जिनके सपनोमे जान होती है, पंख बड़े होनेसे कुछ नही हातो हौसलोसेही उँची उड़ान होती है, बांळानो खूप शिका, मोठ्ठे व्हा, आई वडील व आपल्या समाजाचे नांव, उज्वल करा छोटया अपयशाने खचुन जावु नका आत्मविश्वास आणि सचोटीने यशव्ही व्हा, असे शुभाशिष चिंतले, त्याचबरोबर, सन्मानिय आमदारसाहेब, श्रीयुत. मंगेशजी चव्हाण यांचे शुभहस्ते तसेच चाळीसगांव तालुक्याचे समाजाचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांनी यथोचित सन्मानित सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले व सर्वाना संत भिमाभोई जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या व धन्यवाद दिले.
कार्यक्रमात वैभव प्रशांत भोई हा इयत्ता आठवीच्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत राज्यातुन पहिला क्रमांक मानकरी ठरल्याबद्दल, तसेच वैभव मन्साराम भोई व वरूण किशोर भोई यांना वैदयकिय प्रवेश मिळाल्याबद्दल त्यांचा विषेश सत्कार सन्मानिय आमदार श्री. मंगेश चव्हाण यांचे शुभेहस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तु देवुन सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी भोईराज फाउंडेशन या फलकाचे अनावरण करण्यांत आले, यावेळी चेतन भोई व इतर भोई समाजाचे तरूणवर्गाचा प्रतिसाद लाभला. जयंती निमित्ताने समस्त भोई समाजाचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष श्री. मल्हारी संपत भोई सचिव श्री. रविंद्र विठ्ठल भोई सहसचिव श्री. अनिल उत्तम भोई तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गंभीर भोई कार्याध्यक्ष श्री. आबा चंद्रकांत भोई खजिनदार श्री. चेतन विश्वनाथ भोई तसेच समाजाचे सर्वच बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी संजीव आबा साहेब, तसेच इतर समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते, कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री. दिपकजी भोई यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक श्री.ज्ञानेश्वर भोई यांनी केले, तर सुत्रसंचालन व आभार प्रा. श्री. मनोहरजी आंधळे, यांनी केले, या बद्दल त्यांचा विषेश सत्कार श्री धनराळे यांनी केला व कार्यक्रम संपन्न झाला आहे.