“राशीवन उद्यान ” ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या विरंगुळ्यासाठी उद्घाटन समारंभ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मा.रमेश आप्पा थोरात यांचे हस्ते करण्यात आले.

Read Time3 Minute, 42 Second

दौंड(प्रतिनिधी) आज दि 10 मार्च 2020 रोजी खुटबाव ग्रामपंचायत वतीने चौदाव्या वित्त आयोगातून 2019/2020 च्या निधीतून सहा लाख रूपये खर्चाचे “राशीवन उद्यान ” ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या विरंगुळ्यासाठी उद्घाटन समारंभ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मा.रमेश आप्पा थोरात यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दौंड पंचायत समिती उपसभापती नितीन दोरगे, गणेश कदम जि.प.सदस्य. सरपंच दशरथ थोरात. उपसरपंच तेजश्री थोरात ,माजी सरपंच शिवाजी थोरात, वि.का.सो.चेअरमन संजय थोरात, मिना चव्हाण, कोडिबा थोरात, दिगंबर थोरात,सुनिल फणसे, सुभाष देशमुख, शरद शेलार ,योगेश थोरात, संतोष थोरात उपस्थित होते.
याप्रसंगी उपसभापती नितीन दोरगे यांनी रमेश आप्पा थोरात यांचे मार्गदर्शनाखाली जनतेची अनेक विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मा रमेश आप्पा थोरात यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कामकाज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली काटकसरीने कामकाज केल्याने बॅंकेचे कामकाज देशात अव्वलस्थानी असल्याचे सांगितले. शेतकरी व सर्वसामान्य घटक डोळ्यासमोर ठेवून संस्था पदाधिकारी यांनी कामकाज केल्यास संस्थांची भरभराट होऊन सर्वसामान्यांचे हित जोपासले जाईल यासाठी पदाधिकारी यांनी जबाबदारीने पदासाठी न्याय द्यावा. बॅक 102व्या वर्षात पदार्पण करत असताना यंदाही भरघोस नफा होणार असल्याचे सांगितले. कोरोनाबाबत सर्वांनी काळजी घेणेबाबत सावध असावे.सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून रेल्वे स्टेशन झालेने खुटबाव गावच्या विकासात गती आल्याचे सांगितले. भांडगाव खुटबाव रस्ता काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले .भैरवनाथ शिक्षण संस्थेत शिस्त व गुणवत्तेला महत्त्व दिल्याने अनेक मुलामुलींना शिक्षणाची ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध झाली. महाविद्यालयीन गुणवत्ता वाढल्याने अनेक संस्था खुटबाव गावाला भेट देत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी सरपंच शिवाजी थोरात यांनी खुटबाव गाव जिल्हा स्तरावर स्मार्ट व्हिलेज होण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
स्वागत ग्रामविकास अधिकारी जालिंदर पाटील यांनी केले.
सुत्रसंचालन नवनाथ थोरात यांनी केले.
आभार माजी प्राचार्य अरूण थोरात यांनी मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post आमदार राहुल कुल व प्रेमसुखजी कटारिया यांच्या संकल्पनेतून शहरातून होत असलेली अवजड वाहतूक बायपास मार्गे शहराबाहेरून होईल
Next post बसपा कार्यलयात तोडफोड, दोघांना मारहाण. तिघांवर अट्रोसिटी गुन्हा दाखल
error: Content is protected !!
%d bloggers like this: