अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
ढोमणे गावातील अवैध दारु विक्रीविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
वंचित बहुजन आघाडीचे निवेदन प्राप्त होताच ग्रामीण पोलिस ठाण्यातर्फे तत्काळ पथक तयार केले असून अवैध दारू विक्री वर कारवाई केली जाणार आहे,तसेच या कारवाया सातत्याने सुरू राहणार असून कोणत्याही कायद्याविरुद्ध गैरकृत्य सहन केले जाणार नाही तसेच नागरिकांनी देखील अश्या गैरप्रकारची माहिती देत पोलिस प्रशासनास सहकार्य करावे – पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील ग्रामीण पोलिस ठाणे
चाळीसगाव (प्रतिनिधी) :तालुक्यातील ढोमणे गावात सुरु असलेल्या अवैध हातभट्टी दारु विक्रीमुळे गावातील तरुणाई मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची गंभीर बाब वंचित बहुजन आघाडीने दिनांक 25 ऑगस्ट रोजी पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनातून समोर आली आहे.अवैध दारूविक्री विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक असून ग्रामिण पोलीस ठाणे चाळीसगाव येथील पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांना लेखी निवेदन देत अवैध दारुविक्री तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली.
चाळीसगाव शहर पोलिसांचे यश – २५ गहाळ मोबाईल हस्तगत, मालकांना परत
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावातील आशाबाई संतोष सोनवणे यांच्या पतीचा मृत्यू दारुच्या व्यसनामुळे झाला असून अल्पवयीन मुलंही या व्यसनाच्या अधीन होत असल्याची गंभीर परिस्थिती आहे. आशाबाई संतोष सोनवणे व कैलास छन्नु सोनवणे यांनी संबंधित अवैध विक्रेत्यांना जाब विचारल्यावर त्यांना दमदाटी करण्यात आली आल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सागर निकम, तालुका उपाध्यक्ष हंसराज पगारे, दानिश मन्यार, दीपक सोनवणे, बाळा देशमुख, तुषार मोरे, विशाल सोनवणे, रामा मोरे, दीपक सरदार, अमोल केदार यांच्यासह तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ढोमणे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

