अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी): आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी रूट मार्च काढण्यात आला.
हा रूट मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणपती विसर्जन मुख्य मार्ग,वस्ती, सराफ बाजार या प्रमुख मार्गावर सकाळी 10.00 ते 11.00 वाजेदरम्यान पार पडला.
सदर रूट मार्च महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव व श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विजयकुमार ठाकुरवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) चाळीसगाव विभाग यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.
रूट मार्चानंतर सर्व अधिकारी व पोलीस अंमलदारांना आगामी सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
या रूट मार्चमध्ये 80 पोलीस अंमलदार, 40 होमगार्ड व 10 पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.
