अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
Fit India Movement अंतर्गत सामाजिक व आरोग्यवर्धक उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – भारत सरकारच्या ‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक २४ ऑगस्ट रोजी भव्य सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला जळगावकर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रॅलीचा मार्ग व अंतर
या उपक्रमाची सुरुवात पोलीस मुख्यालय, जळगाव येथून झाली. त्यानंतर कानळदा रोडमार्गे पुन्हा मुख्यालयात समारोप करण्यात आला. एकूण २५ किलोमीटर अंतर सायकलस्वारांनी पूर्ण केले.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रॅलीत पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत जळगाव सायकलिस्ट ग्रुप आणि शहरातील नागरिकांनी शेकडो संख्येने भाग घेतला.अंदाजे २०० ते २५० नागरिकांनी यात सहभाग घेतला.“फिटनेस की डोस – आधा घंटा रोज” हा संदेश सायकलस्वारांनी शहरवासीयांना दिला.
अधिकारी व विभागांचे योगदान
या उपक्रमात विविध अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले :
वाहतूक शाखा – पोलीस निरीक्षक श्री. पवन देसले
स्थानिक गुन्हे शाखा – पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील
पोलीस मुख्यालय – रा. पो. निरीक्षक प्रशांत सुगरवार
ए एच टी यु (AHTU) – सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे
जळगाव पोलीस प्रशासनाचा संकल्प
पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या हा उपक्रम राबविण्यात आला. यापुढेही जळगाव पोलीस प्रशासनाने अशा सामाजिक व आरोग्यदायी कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
