अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)– संत बाबा गरीबदास बाबा यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त नेत्रज्योति हॉस्पिटलतर्फे दि. १५ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत दुपारी ३.०० ते ७.०० वाजेपर्यंत भव्य निःशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
गुरु-शिष्य नात्याची पवित्रता जपलीच पाहिजे
या शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शिरीष पाटील, डॉ. हीरा जोशी, डॉ. तुषार बोंबटकर व डॉ. रेवती महाजन यांच्या मार्फत तपासणी करून रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे, पिवळे व केसरी कार्डधारक तसेच उत्पन्नाचा दाखला व आधारकार्ड असलेल्या पात्र रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल. निवडलेल्या रुग्णांवर इंडियन लेन्स टाकून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून पॅथॉलॉजी तपासणीही मोफत केली जाणार आहे. याशिवाय, रुग्ण व त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांसाठी राहण्याची तसेच चहा–नाश्ता व जेवणाची सोय मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना पहिली औषधीसुद्धा मोफत दिली जाणार आहे.
या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नेत्रज्योति हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. गुरुमुख जगवाणी, उपाध्यक्ष श्री. दिलीपकुमार मंघवाणी, सेक्रेटरी श्री. धनराज चावला तसेच सर्व ट्रस्टीगणांनी केले आहे.
