Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

भारतीय संविधान गौरव दिन | दौंड मध्ये संविधान गौरव दिन जल्लोषात साजरा,संविधान स्तंभ संवर्धन समितीकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन.

0
0 0
Read Time3 Minute, 40 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-७४ वा भारतीय संविधान गौरव दिन दौंड शहरात उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.दौंड मध्ये संविधान स्तंभ संवर्धन समितीकडून संविधानाचा प्रचार प्रसार जनजागरण करण्याचे राष्ट्रीय काम हाती घेण्यात आले.संविधान स्तंभ संवर्धन समितीच्या वतीने संविधान प्रचार प्रसार जनजागृती संविधान व्याख्यान,संविधान शाहिरी,जलसा तसेच दौंड शहरातील शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.शुक्रवार (ता.२४) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते जगदीश ओव्हळ यांचा भारतीय संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.शनिवार (ता.२५)आम्ही भारताचे लोक मोहीम, युगक्रांती सांस्कृतिक युवा मंच शाहिरी जलसा मुंबई सादरकर्ते संविधान प्रेमी आकाश पवार व ऐश्वर्या पवार आणि सहकारी यांचा ‘हमारा संविधान है’ चे आयोजन करण्यात आले होते.रविवार (ता.२६) रोजी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान स्तंभास मानवंदना देण्यात आली.यावेळी माजी आमदार रमेश थोरात, मा.नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे पाटील,बादशाह शेख,नंदु पवार,युवा नेतृत्व तुषार थोरात,गुरुमुख नारंग,उत्तम सोनवणे,जयदीप बगाडे,नागेश साळवे,राजु सोनवणे,नंदु बनसोडे,नंदु जगताप,शैलेश पवार,बाबा पवार, अश्विन वाघमारे,विनायक माने,अभिजीत शिंदे, विलास शितोळे,सोहेल खान, सचिन कुलथे,आनंद बगाडे,मतीन शेख, राजाभाऊ कदम, सागर उबाळे,राजेश मंथने,भारत सरोदे,प्रमोद राणेरजपुत,फिलीप धुमाळ,उत्तम आटोळे,राजेंद्र खटी,भीमराव मोरे,ज्ञानेश्वर मजगर,बी.वाय.जगताप,मोकाशी सर, शामसुंदर सोनोने,महादेव कवडे,गुलाब जमादार,आशा मोहिते,अनिता लोंढे, साधना सोनोने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पवार, यादव जाधव यांनी केले.संविधान गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन संविधान स्तंभ संवर्धन समितीचे अध्यक्ष दिपक सोनवणे यांनी केले होते.कार्यक्रमाचे आयोजन संत गाडगे महाराज चौक,दौंड संविधान स्तंभ परिसराच्या प्रांगणात करण्यात आले होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: