Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

50 वर्षीय इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू,शहर पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

0
1 0
Read Time3 Minute, 4 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)- दि 28 फेब्रुवारी रोजी सकाळी ०६:४० वाजे चे सुमारास गार ता. दौंड जि पुणे गावचे हद्दीत रेल्वे अप मेन लाईन कि. मी. नंबर २५७/६ चे जवळ एक पुरूष जातीचे अनोळखी प्रेत वय अंदाजे ५० वर्षे नाव पत्ता माहीत नाही. हे रेल्वे अपघातात रूळाचे बाजुला पडुन जखमा होवुन मयत स्थितीत आढळुन आलेले आहे. त्याबाबत दौंड पोलीस स्टेशनला मयत रजिस्टरी दाखल करण्यात आलेले आहे.
सदर मयत अनोळखी इसमाचे सविस्तर वर्णन एक अनोळखी इसम वय अंदाजे ५० पत्ता माहीत नाही. मयताचे अंगात नेसणीस हिरवा पांढरा चौकडा
फुल बाहयाचा शर्ट, काळे रंगाची फुल पॅन्ट, लाल रंगाचे हाफ बनियन, चॉकलेटी रंगाची व्हिनस कंपनीची
अंडरवियर घातलेली आहे. रेल्वे अपघातात त्याचे डावे डोळयाचा चेंदामेंदा झालेला दिसत असुन, दाढी व मिशी
काळी पांढरी दिसत आहे. समोरील दोन दात पडलेले, हनुवटीखाली जखम दिसत आहे. उजवा हात कोपरापासुन मोडलेला दिसत आहे. उजव्या हाताचे पोटरीवर दोन ठिकाणी गोंदलेले दिसत असुन,
त्यामध्ये एका ठिकाणी त्रिशुलचे चित्र व दुस-या ठिकाणी दुस-या भाषेतील नाव गोंदलेले दिसत आहे. डावा खादा
मोडलेला दिसत असुन, डावे हाताचा मनगट मोडलेले दिसत असुन मोठी जखम दिसत आहे. उजवा पाय
गुडघ्यापासुन नडगीपर्यंत पुर्ण चेंदामेंदा झालेला दिसत असुन, डावे बाजुला कमरेला जखम दिसत आहे. उजवा पाय नडगीपर्यंत चेंदामेंदा झालेला दिसत आहे. डावे पायाच्या गुडघ्यामध्ये पुर्वी ऑपरेशन करून त्यामध्ये रॉड व एक वाटी व त्यात तीन स्क्रू दिसत आहेत. मयताचे
डावे हातात गणेशमुर्ती असलेला काळा धागा दिसत आहे. तरी वर नमुद अनोळखी मयत इसमाचा व त्याचे नातेवाईकांचा शोध सुरू असून सदर मयतास कोणीही ओळखत असल्यास दौंड पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले असून पुढील तपास पोलिस निरिक्षक श्री. विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली महेंद्र गायकवाड सहा. पोलीस उपनिरिक्षक हे करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: