जनसामान्यांना आनंदाची बातमी,देवळाली भुसावळ पॅसेंजर होणार सुरू,निर्णयाचे स्वागत ,वेळापत्रक पूर्वीचेच ठेवा-आमदार चव्हाण

3 0
Read Time3 Minute, 15 Second

संपादक गफ्फार मलिक(शेख)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगांव(प्रतिनिधी)- जनसामान्यांना परवडणारी तसेच जनसामान्यांचा प्रवास सोयीस्कर करणारी देवळाली भुसावल पॅसेंजर दिनांक 17 सप्टेंबर पासून पुन्हा धावणार जनसामान्यांचा प्रवास होणार पुन्हा सोईस्कर
कोरोना काळापासून बंद असलेली देवळाली भुसावळ पॅसेंजर ची प्रतीक्षा संपली असुन ही पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यात येत आहे,त्यामुळे जनसामान्यां तसेच रोज अपडाऊन करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे,देवळाली भुसावळ पॅसेंजर च्या वेळेत थोडा बदल करण्यात आला असून वेळ खाली चित्रात दिल्या प्रमाणे असणार आहे.

देवळाली भुसावळ पॅसेंजर सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत पण वेळ पूर्वीचाच ठेवावा-आमदार मंगेश चव्हाण

गेल्या २ वर्षांपासून प्रवाशी संघटना, चाकरमानी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणी नुसार अखेर रेल्वे प्रशासनाने देवळाली भुसावळ पॅसेंजर एक्स्प्रेस स्वरूपात सुरू करण्यास मान्यता दिली आहे. सर्व प्रवाशी संघटनांच्या मागणीचे हे यश असून उशिरा का होईना त्यांना न्याय मिळाला आहे. यासाठी मी वेळोवेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेबजी दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता व त्यांनीही सकारात्मकता दर्शवत संबंधितांना सूचना दिल्या होत्या. ना.रावसाहेबजी दानवे व रेल्वे प्रशासनाचे मनापासून आभार.

या निर्णयाचे चाळीसगाव मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने स्वागत करतो मात्र जळगाव येथे रोजगारासाठी अप डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना देवळाली भुसावळ शटल च्या माध्यमातून शेवटची अपेक्षा होती मात्र रेल्वे प्रशासनाने जळगाव कडे जाण्याच्या वेळेत प्रशासनाने बदल केला असल्याने नियमित अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांनी यावर तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांना या वेळेत धावणाऱ्या रेल्वेचा काहीही फायदा होणार नसून प्रवाशी – चाकरमानी यांच्या भावनांची दखल घेत प्रशासनाने सदर रेल्वे गाडी पूर्वीच्या वेळेतच सुरू करावी ही विनंती.

  • आमदार मंगेश रमेश चव्हाण
Happy
Happy
78 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
22 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.