पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांना सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

Read Time1 Minute, 29 Second

अधीकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे


चाळीसगाव(प्रतिनिधी) दि 13 आजपासून दिवाळी चे पर्व सुरू होत असून या दिवाळीच्या दीपोत्सवात पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांना लावून सह्याद्री प्रतिष्ठान दिवाळी सणाची सुरुवात केली असून ज्या छत्रपती मुळे आज तमाम देवालयांमधील देव सुरक्षित आहेत त्या छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज घाट येथील पुतळ्यासमोर सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत दिवे लावून रोशनाई करून मानवंदना देऊन आज दिवाळी साजरी करायला सुरुवात केली आहे असे सांगत सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनी या अभिनव उपक्रमाची आपल्या सहकाऱ्यांसोबत सुरवात केली यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, गजानन मोरे, निलेश हमलाई ,रविंद्र सुर्यवंशी ,विनोद शिंपी ,दिगंबर शिर्के ,गौरव पाटील ,जितेंद्र वरखेडे ,सोहम येवले आदी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

“रोहयो”तून पर्यावरण पूरक दुप्पट उत्पन्न देणारी शाश्वत शेतीतून आत्मनिर्भर शेतकरी तयार व्हावेत — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन.

Read Time3 Minute, 7 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

जळगाव लोकसभा मतदार संघातील रोहयो कामकाजासंदर्भात आढावा बैठक संपन्न : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांशी खासदार उन्मेश दादा यांनी साधला संवाद

जळगाव — घरकुल गाय गोठा शेड/ शेळी पालन शेड / कुकुटपालन शेड यांची ची किती कामे झालीत या कामांवर किती जणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला एवढेच नव्हे तर एप्रिल 2021 ते मार्च 2022 यासाठी लेबर बजेट बनवावे यात ग्रामसेवक सरपंच यांची ट्रेनिंग घेऊन शिवार फेरी आयोजित करून कोणती कामे घ्यावेत कोणती कामे घेऊ नयेत याबाबत मार्गदर्शन घेण्यात यावे.
ग्रामसेवक सरपंच यांच्या सात तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित करून येत्या काळात शोषखड्डा व सांडपाणी व्यवस्थापन, रुफ वाटर हार्वेस्टिंग, युरीन कलेक्शन (गोमुत्र कलेक्शन) , शाश्वत उत्पन्नासाठी माझा बांध माझे झाड तसेच घनकचरा व्यवस्थापन, व्हर्मीकंपोस्ट, अभिसरणातून अकुशल कुशल निधीतून साखळी पद्धतीने बंधारे या सारखे उपक्रम “रोहयो”तून राबवून पर्यावरण पूरक दुप्पट उत्पन्न देणारी शाश्वत शेतीतून आत्मनिर्भर शेतकरी तयार व्हावेत असे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित
जळगाव लोकसभा मतदार संघातील रोहयो कामकाजासंदर्भात आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपन्न झाली. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी यावेळी मार्गदर्शक सूचना केल्या. रोहयोचे उप जिल्हाधिकारी राहुल बोटे यांनी बैठकीचे संचालन केले. शेवटी आभार मानले. यात पाचोरा, भडगाव, जळगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल,धरणगाव, चाळीसगाव या सर्व तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांशी खासदार उन्मेश दादा यांनी संवाद साधला. अंमळनेर गटविकास अधिकारी संदीप वायाळ , चाळीसगाव गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी काही लक्षवेधी सूचना मांडल्या.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

पारोळा तालुक्यातील टोळी येथील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रसंगी चाळीसगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन,आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी

Read Time3 Minute, 36 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

टोळी(पारोळा)-टोळी ता पारोळा येथील 20 वर्षीय तरुणी ही पारोळा येथील लक्ष्मीबाई महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होती दिवाळीच्या सुट्टीत पारोळा येथे वास्तव्याला असलेले तिचे मामा त्यांच्याकडे तीन नोव्हेंबर पासून आली होती दिनांक 7 रोजी दुपारी अडीच वाजता मेडिकलवर जाऊन येते असे सांगून घरून निघाली,पण बराच उशीरा पर्यंत घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला पण तिचा तपास न लागल्याने तिच्या मामांनी दि 8 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली , दि 8 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ती जुलूम पुरा येथे बालालबागच्या मळ्यात विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आली यावेळी याठिकाणी काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांना ही मुलगी दिसली त्यांनी लगेच मोटारसायकलीने तिला पाठवा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे भाऊसाहेब हिरे रुग्णालयात हलविण्यात आले तीन दिवस तिच्यावर उपचार झाले तिने मृत्यूशी झुंज दिली पण दि 10 रोजी पहाटे चार वाजता तिची प्राण ज्योत विझली सदर घटनेतील आरोपी शिवनंदन पवार त्यासोबत असलेले दोन जण पप्पू अशोक पाटील अशोक रावजी पाटील यांनी आळीपाळीने सामूहिक आत्त्याचार केला आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात चालावावा व आरोपींना फाशी व्हावी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व त्या पीडिताच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे व कुटुंबातील व्यक्तींना सरकारने आर्थिक मदत घोषित करावी अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील चर्मकार समाज बांधव विविध संघटना कडून निषेध नोंदवून तहसीलदार साहेब यांना आज दि 12 रोजी निवेदन देण्यात आले

यावेळी आनंद गांगुर्डे,श्रीकृष्ण वाघ,नगरसेवक अरुण आहिरे,नगरसेवक रामचंद्र जाधव,प्राध्यापक गौतम निकम सर,मुकेश नेतकर,तुषार नकवाल,अशोक जाधव,मंगल जाधव,महिंद्र सूर्यवंशी, रोहित शिंदे ,प्रशिक कदम ,नितीन पवार ,शिवाजी गांगुर्डे ,स्वप्नील जाधव, मंगेश गांगुर्डे ,प्रशांत आहिरे ,सागर गांगुर्डे ,सिद्धार्थ मोरे, विशाल मोरे ,दत्तात्रय चौधरी, सोपान आहिरे ,गोकुळ अहिरे आदी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

नारायण वाडीतील अवैध दारूविक्रीचा धंदा उध्वस्त,शहर पोलिसांची कारवाई

Read Time1 Minute, 19 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत आज रोजी पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सपोनि मयूर भामरे व पथकाने पायी गस्तीदरम्यान नारायणवाडी भागातील लक्ष्मी माता मंदिराजवळ आरोपी नामे शुभम पद्माकर कदम वय- 21वर्षे, राहणार- आनंदवाडी, चाळीसगाव हा त्याचे ताब्यात देशी दारूच्या 53 बाटल्या चोरट्या विक्रीसाठी बाळगून असल्याचे मिळून आल्याने रक्कम रुपये 2756/- ची देशी दारु तसेच अंगझडतीतील 10000 रु किमतीचा मोबाईल व 1350 रु रोख असा एकूण 14106 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पो स्टे ला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय शिंदे हे करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

गुन्हे शाखा युनिट 2 ची आणखीन 1 कारवाई….

Read Time1 Minute, 44 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

चिंचवड(प्रतिनिधी) दिनांक 06/11/2020 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 ची टीम सह PSI निलपत्रेवार , पोहवा स्वामी,पोहवा वेताळ, पोहवा माने, पोना जयवंत राऊत, नामदेव उर्फ देवा राऊत, अजित सानप असे हद्दीत पेट्रोलींग करत आसताना जयवंत राऊत यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की एक इसम घातक आग्नीशस्त्र घेवुन बिजलीनगर येथे येणार आहे आशी माहीती मिळाल्याने सदरची माहिती मिळाल्याने शैलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनखाली सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार व स्टफ यांनी सापळा रचुन बातमीतील इसमास ताब्यात घेतले त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव १) तुषार उर्फ दादया रविद्र खांगटे वय 32 वर्षे धंदा मजुरी रा बिजलीनगर चिंचवड असे सांगीतले त्याची अंगझडती घेतली आसता त्यांचे कमरेला गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस मिळुन आले ते दोन पंचा समक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध आर्म अॅक्ट 3 [ 25] प्रमाणे चिंचवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास चालू आहे

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यास अग्रणी असणारे दिलीप घोरपडे यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या सदस्यपदी निवड

Read Time1 Minute, 25 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगाव(दि 06)-गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यात अग्रणी असणारे तसेच चाळीसगाव येथील शिवसेनेचे प्रवक्ते, सह्याद्री प्रतिष्ठानचे मा.प्रदेशाध्यक्ष दिलीप घोरपडे यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य समन्वय समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड जाहिर करण्यात आली आहे, नुकतीच दौलताबाद येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय बैठकीत ही निवड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमीक गोजमगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली असून या समितीत निलेश जेजुरकर सचिन शेंडगे गणेश खुटवड सदानंद पिलाणे गणेश रघुवीर दिलीप सोनवणे या सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे त्यांची ही निवड म्हणजे गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मनापासूनची आवड या कामाची पावती आहे त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

कजगाव गोंडगाव रस्त्यावर उसाचा भरलेला ट्रक पलटी,सुदैवाने जीवित हानी नाही

Read Time1 Minute, 10 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

कजगाव(प्रतिनिधी)दि 6 कजगाव येथे गोंडगाव रस्त्यावर उसाचा भरलेला ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पलटी उसाचा ट्रक क्रमांक MH 41 G 5874 कोळगाव वरून कन्नड माल घेऊन जात असतांना आज दि 6 नोव्हेंबर 2020 शुक्रवार रोजी दुपारी दोन अडीच च्या सुमारास चालकाचा रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या कड्याला ट्रक पलटी झाला सुदैवाने जीवित हानी झाली नाही

कजगाव गावातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ गावातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत चालकास गाडीतून सुखरूप बाहेर काढले असून चालकास किरकोळ लागलेले असून वाहनाचे नुकसान झालेले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

नगरसेवक परिषद, मुंबई,महाराष्ट्र या राज्य पातळीवर काम करणाऱ्या संस्थेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी दौंड नगरपालीकेच्या विद्यमान नगरसेविका ऍड .सौ.अरूणाताई डहाळे यांची निवड

Read Time2 Minute, 12 Second

दौंड(प्रतिनिधी)दि 5- नगरसेवक परिषद, मुंबई,महाराष्ट्र या राज्य पातळीवर काम करणाऱ्या संस्थेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी दौंड नगरपालीकेच्या विद्यमान नगरसेविका ऍड .सौ.अरूणाताई डहाळे यांची निवड झाली आहे.
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.राम जगदाळे पाटील व राज्य सरचिटणीस मा.कैलास गोरे पाटिल यांनी निवडीचे प्रमाणपत्र देवुन त्यांचे संघटनेत स्वागत केले. सदरची संस्था राज्य पातळीवरील सर्व नगरपालिका, नगरपंचायती,महानगरपालिका यातील सर्व पक्षीय नगरसेवक, नगरसेविका यांचे संघटन करून विविध मागण्या राज्य सरकार कडे करीत आहे. राज्य पातळीवर संघटना मजबूत झाल्यास अनेक नगर विकासाच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून घेऊन जनतेला दिलासा देता येईल. तसेच नगरसेवकांचे मानधन वाढवणे, नगरसेवकांना समान नीधी मिळावा,नगरसेवकांना मंत्रालय प्रवेश त्यांच्या ओळखपत्रावरच देण्यात यावा,पेन्शन देण्यात यावी अशा विविध मागण्या शासनदरबारी मांडुन पाठपुरावा करणार आहेत. दौंड नगरपालीकेच्या धडाडीच्या, कार्यक्षम व निष्ठावंत नगरसेविका अॅड.सौ.अरूणा ताई डहाळे यांची पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे शहरातील प्रलंबित विकास योजना व इतर अनेक नगरपालीकेच्या संदर्भातील कामांना बळ मिळणार आहे. त्यांच्या निवडी बद्दल संघटनेचे धन्यवाद!व अॅड.अरुणा डहाळे यांचे निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

गहुंजे, हिंजवडीसह काही गावे पिंपरी- चिंचवड महापालिकेत समाविष्ट करून घेण्याबाबत पुन्हा जोरदार हालचाली सुरू

Read Time3 Minute, 33 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

चिंचवड(प्रतिनिधी)-गहुंजे, हिंजवडीसह काही गावे पिंपरी-
चिंचवड महापालिकेत समाविष्ट करून घेण्याबाबत पुन्हा
जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. 11 गावे पालिकेत
समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने पालिका आयुक्तांचा प्रस्ताव
आला आहे.
त्यावर पुढील कारवाई करण्यासाठी विभागीय
आयुक्तांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. अभिप्राय
प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे
राज्याच्या नगरविकास खात्याने सांगितले आहे.

हिंजवडी, गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे ही सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी भाजपचे
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी 4 मार्च 2020 रोजी राज्य सरकारकडे केले होती.आमदार जगताप यांनी पत्रात म्हटले होते की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नगरविकास विभागाकडे हिंजवडी,गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे या पालिका क्षेत्रा लगत असलेल्या गावांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे.
देशात आयटी क्षेत्रात नामांकित असलेले हिंजवडी आयटी हबव गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा विकास होत आहे.
मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास
ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर अपयश येत आहे. वाढत्या
लोकसंख्येमुळे या परिसराचा बकालपणा वाढत आहे.
या गावातील ग्रामपंचायती निधी अभावी सार्वजनिक सेवा,
सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे कचरा,
पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे असे प्रश्न या भागात भेडसावत
आहेत.
या गावांचा सर्वांगीण विकास नियोजनबद्ध होणे आवश्यक
आहे. त्यासाठी ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात
समाविष्ट केल्यास विकास होणे सोईचे होईल. त्यामुळे या
गावांना महापालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची मागणी त्यांनी केली होती.
आमदार जगताप यांच्या पत्राला राज्य सरकारचे उपसचिव
सतीश मोघे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले
आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत 11 गावे समाविष्ट
करण्याच्या अनुषंगाने आयुक्तांचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.
त्यावर पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून विभागीय
आयुक्तांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

अवैध ताडी वाहतूक पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,वाहणासोबत आरोपी ताब्यात

Read Time2 Minute, 34 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली LCB पथकाने दि.०४/११/२०२० रोजी दौंड पोलिस स्टेशन हद्दीत कुरकुंभ येथे पेट्रोलिंग करीत असताना पथकास मिळालेल्या माहिती नुसार एक इसम आपले पिकअप गाडी मध्ये ताडी वाहतूक करत असताना मिळून आला त्याचे कब्जात प्लास्टिक दुधा चे कॅन मध्ये ४० लिटर ताडी चे ५ व एक प्लास्टिक टाकी विक्री साठी वाहतूक करताना मिळून आला याआरोपीचे नाव प्रकाश शामराव भंडारी असे आहे वय.३२रा. रणगाव ता.इंदापूर जि.पुणे ताडी वाहतूक करत असताना मिळून आला

त्याचे ताब्यातून एक पांढरे रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी किंमत अंदाजे ५००००० रुपये तसेच एक टाकी व ५ दुधाचे कँन्ड ४५० लिटर मापाचे किंमत अंदाजे १४५०० रुपये असा एकूण ५१४५०० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याचेविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम कायदा कलम 65(ई), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व मुद्देमाल दौंड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.


सदरची कामगिरी मा.डॉ. अभिनव देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा.श्री मिलिंद मोहिते अपर पोलिस अधीक्षक सो बारामती उपविभागीय अधिकारी श्री राहुल धस सो, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली पो उप नी शिवाजी ननावरे,पो.हवा सचिन गायकवाड,पो हवा अनिल काळेपो, हवा रविराज कोकरेपो.ना गुरू गायकवाड,पो.ना सुभाष राऊत,पो.ना अभिजीत एकशिंगे तसेच कुरकुंभ चौकीचे पो.हवा हिरवे पो.काँ चांदने पो काँ राऊत यांने केलेली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %