अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
यावल (प्रतिनिधी) : यावल पोलीस स्टेशन हद्दीत यावल-चोपडा हायवेवरील फॉरेस्ट कॉलनी परिसरात पोलीसांनी सापळा रचून ४ किलो गांजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या तिघा इसमांना अटक करून गांजा व मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव पोलीस दलाची सायक्लोथॉन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली.
दिनांक २५ जून २०२५ रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार यावल पोलीसांनी सापळा रचून मोटारसायकलवरून गांजा वाहतूक करणारे युसुफ शहा गुलजार शहा (५५, रा. मुस्लिम कॉलनी, ताज हॉटेल जवळ, खडका रोड, भुसावळ),युनूस सुलतान शेख (५१, रा. गरीब नवाज मशीद जवळ, खडका रोड, भुसावळ, मूळ रा. सुरत, गुजरात) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी हा गांजा भानसिंग पुट्ट्या बारेला (रा. वाघझिरा, ता. यावल) याच्याकडून १५ हजार रुपयांना विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर भानसिंग बारेला यासही अटक करण्यात आली आहे.
सबमर्सीबल व सोलर पंप चोरी करणारे तीन आरोपी जेरबंद
सदर प्रकरणी यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्र. २४७/२०२५, NDPS कायदा कलम 20(b)(ii)(B), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना २६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोउनि अनिल महाजन, सफौ विजय पाचपोळे, पोहेकॉ रोहिल गणेश, पोना वसीम तडवी, पोना अमित तडवी, पोकॉ आर्षद गवळी, पोकॉ सागर कोळी व चापोहवा ज्ञानेश्वर सपकाळे यांनी केली. पुढील तपास अ.पो.नि. अजयकुमार वाढवे करीत आहेत.
