अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – आज दुपारी साधारण 3 वाजेच्या सुमारास अवघ्या 10 मिनिटांच्या पावसामुळे जिल्हा परिषद उपविभागाच्या उपअभियंता कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. या पाण्यामुळे कार्यालय परिसरात पाऊल टाकणे देखील कठीण झाले.
ग्रामीण भागातील रस्ते सुधारणा, मोऱ्यांचे बांधकाम, शासकीय इमारतींची देखभाल-दुरुस्ती, तसेच विविध शासकीय योजनांच्या कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी उपअभियंता कार्यालयाची आहे. निधीचा खर्च, तांत्रिक नियंत्रण आणि कामांची प्रगती यावर लक्ष ठेवण्याचे कार्य करणाऱ्या या कार्यालयाच्या आवारातच पावसाचे पाणी साचल्याने विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.?
तालुक्यातील विकासकांना नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना करणारे कार्यालय आपल्या कार्यालयाच्या परिसरात उपाययोजना करू शकत नसेल का? की विशिष्ट त्यांनी स्वतः तयार केलेल्या नियमांच्या आधीन राहून कार्य करण्यात त्यांना रस आहे?
अवघ्या दहा मिनिटांच्या पावसानेच कार्यालय परिसर जलमय झाला, यामुळे “स्वतःचेच कार्यालय सुरळीत राखता न आल्यास ग्रामीण भागातील विकासकामांवर कसा नियंत्रण ठेवणार?” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगताना दिसून आली.
