संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- माजी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री.रावसाहेब दादा दानवे यांनी आज आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अंत्योदय जनसेवा कार्यालयाला भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी कार्यालयाचे कामकाज जाणून घेतले आणि आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.
अंत्योदय जनसेवा कार्यालय हे समाजातील गरजू लोकांसाठी विविध शासकीय सेवांसाठी अर्जा पासून ते मार्गदर्शन करून योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी समर्पित आहे.या कार्यालयाद्वारे गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचे फॉर्म मोफत भरून मार्गदर्शन केले जाते व योजनांचा लाभ जनतेला मिळवून दिला जातो.माजी केंद्रीय मंत्री दानवे यांनी या कार्यालयाच्या कामगिरीची प्रशंसा करताना आमदार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली गोरगरीब जनतेची सेवा निरंतर सुरू ठेवण्यासाठी असाच पुढाकार घ्यावा असा सल्ला देखील दिला.
या भेटीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवेंचे आभार मानले आणि पक्षाच्या ध्येयधोरणे राबविण्यासाठी व समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी नेहमीच कार्य करत राहणार असल्याचे सांगितले.
