अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी):नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे आज (दि. २७ ) १०८ मुलींच्या कन्या पूजनाचा धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व उपशिक्षिका यांच्या हस्ते कन्यांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता जय मातादी च्या जयघोषाने झाली. शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व उपशिक्षिका स्वाती नाईक यांनी मुलींचे पाय धुऊन, त्यांना हळद-कुंकू लावून पूजन केले. मुलींना फुलं, प्रसाद व ओवाळणी देण्यात आली. शाळेच्या परिसरात धार्मिक आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी भुलाबाई महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रही आयोजित करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्यावर भर देत, “ज्या गोष्टी शिकताना आनंद मिळतो, त्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करा,” असा संदेश दिला.
उपशिक्षिका सोनाली चौधरी व करिष्मा वंजारी यांनी मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
