अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
चाळीसगाव (प्रतिनिधी) –श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात परंपरा, संस्कृती आणि प्राण्यांबद्दलचे प्रेम विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी बैलांना आकर्षक सजावट करून दैवत मानल्या जाणाऱ्या बैलांची पूजा केली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बैलाचे महत्त्व, शेतकऱ्यांच्या जीवनातील त्याचे स्थान आणि ग्रामीण भागातील या सणाचे सांस्कृतिक व धार्मिक मूल्य याबद्दल माहिती दिली.
शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येतो. शेतकऱ्यांचे दैवत मानल्या जाणाऱ्या बैलाच्या पूजेमुळे श्रमाला दिला जाणारा मान व निसर्गाशी असलेले आपले नाते याचे भान विद्यार्थ्यांना होत आहे.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम उत्साहात पार पडला.
