अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या चाळीसगाव शहर सचिव पदी सचिन गुंजाळ यांची निवड करण्यात आली.याबाबत सविस्तर माहिती अशी, सामाजिक व पत्रकार क्षेत्रात आपले नावलौकिक मिळवलेले स्व .पप्पू दादा गुंजाळ यांचे पुतणे सचिन गुंजाळ यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या चाळीसगाव शहर सचिव पदी निवड जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांनी केली तसे नियुक्ती पत्र देखील देण्यात आले.
चाळीसगावात महसूल दूतांना प्रशिक्षण; लोकजागृतीसाठी २४ युवक-युवती नियुक्त
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सचिन गुंजाळ यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. या निवडीमुळे सचिन गुंजाळ यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, महिला जिल्हा अध्यक्ष अनिता शिंदे,जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, चाळीसगाव शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील,तालुका उपअध्यक्ष अमोल पाटील,तालुका संघटक शेखर पाटील ,तालुका युवक अध्यक्ष प्रकाश पाटील,युवक संघटक ललित पाटील,पत्रकार सत्यजित पाटील,सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड,सुभाष राठोड आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.
अल्पवयीन बालकास फूस लावून पळविणारा 10 तासात ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
